आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होऊ शकणारे धोके, हे येत्या काळात मानवजातीपुढील मोठे आव्हान असणार आहे...
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ‘सॉफ्टवेअर ऑटोमेशन’चे नवयुग आहे, पण हे ऑटोमेशन साधेसुधे नाही, अशी मतमतांतरं मांडली जात आहेत. इथे हे नोंदवावेसे वाटते की, जेव्हा कुठलेही तज्ज्ञ काही नकारात्मक शक्यतांचे भाकीत करतात, तेव्हा त्या खऱ्या ठरतीलच असे नाही, पण योग्य वेळी योग्य उपाय केले नाहीत, तर त्या प्रत्यक्षात घडूही शकतात, याचा तो इशारा असतो. बऱ्याच वेळेला योग्य उपाय योजून दुष्परिणाम टाळले जातात.......